न्यू फाउंडलंड बेट
न्यू फाउंडलंड बेट : कॅनडाच्या अगदी पूर्वेकडील न्यू फाउंडलंड प्रांताचा, उत्तरेकडील लॅब्रॅडॉर विभाग सोडून दक्षिणेकडील द्वीपरूप विभाग. क्षेत्रफळ १,१२,३०० चौ. किमी. त्यापैंकी सु. १३,८३६ चौ. किमी. पाण्याखाली; लोकसंख्या ४,९३,९३९ (१९७१). विस्तार ४६° ३६′ उ. ते ५१° ३९′ उ. अक्षांश आणि ५२° ३२′ प. ते ५९° २७′ प. रेखांश यांदरम्यान.